अॅनिमेटेड व्हर्जनमध्ये येतोय दबंग सलमानचा चुलबुल पांडे

बॉलीवूडचा दबंग हिरो सलमान खान यांचा चुलबुल पांडे अवतार आजही त्याच्या चाहत्यांच्या मनात घर करून आहे. हा चुलबुल आता बाल प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तयार असून हे लोकप्रिय कॅरेक्टर अॅनिमेटेड व्हर्जन मध्ये छोट्या पडद्यावर येत आहे. ३१ मे पासून रोज दुपारी १२ वा. कार्टून नेटवर्कवर ते प्रसारित होणार आहे. लॉकडाऊन मुळे घरात बसून कंटाळलेल्या बच्चे कंपनीसाठी ही आनंदाची खबर आहे.

या संदर्भात सलमानने रविवारी ट्विटरवर एक प्रोमो शेअर केला आहे. त्यात सलमान म्हणतो,’ भईयाजी, स्माईल, आ गये है चुलबुल पांडे अपने अॅनिमेटेड अवतार में’. अन्य एका ट्विट मध्ये सलमानने कॅप्शन लिहिले आहे, ‘ बच्चोंसे याद आया, स्वागत नहीं करोगे हमारा? चुलबुल पांडे लँड हो राहा हैं, डिस्नी प्लस व्हीआयपी पर. वहीं अॅक्शन, वहीं मस्ती, नये अवतार में.’

वर्क फ्रंटवर बोलायचे तर सलमानचा राधे नुकताच रिलीज झाला असून त्याचे टायगर थ्री, किक २ आणि कभी ईद कभी दिवाली हे आगामी चित्रपट लवकरच रिलीज होणार आहेत.