गाडीमध्ये पेट्रोल भरताना अशी घ्या खबरदारी


पेट्रोलची वाढती किंमत पाहून, ऐकून जरी आपल्याला घाम फुटत असला, तरी ही वस्तू आता जीवनावश्यक झाली आहे हे वास्तव आहे. त्यातून गाडीमध्ये पेट्रोल भरवित असताना फसवणूक होण्याचे अनेक किस्से समोर येत असतात. त्यामुळे आधीच महाग असलेले पेट्रोल खरोखरच चांगलेच महागात पडते. अश्या तऱ्हेची फसवणूक आपल्या बाबतीत होऊ नये ह्या करिता गाडीमध्ये पेट्रोल भरविताना आपण खबरदारी घ्यायला हवी. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरीत असताना पंपाच्या मीटरकडे लक्ष द्यावे. जर हा मीटर थांबून थांबून चालत असेल, तर काहीतरी गडबड असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे मीटर मध्ये गडबड आहे असे लक्षात आले, तर त्या ठिकाणाहून पेट्रोल भरविणे टाळावे. पेट्रोल भरविताना मीटरकडे लक्ष देणे आवश्यक आहे. विशेषतः जे लोक कारमध्ये असतात, त्यांनी एकदा ‘ झीरो ‘ आकडा पहिला, की गाडीमध्ये पेट्रोल किंवा डीझेल भरून होईपर्यंत किंवा त्यानंतरही मीटरकडे लक्ष देत नाहीत, ही सवय टाळावी.

पेट्रोल भरताना केवळ ‘झीरो’ हा आकडा दिसणे महत्वाचे नाही, तर पेट्रोल किंवा डीझेलचा चालू दर पंपाच्या मीटर मध्येही सेट असणे आवश्यक आहे. कित्येकडा पंपावरील पेट्रोलकिती भरले जात आहे हे दर्शविणाऱ्या मीटर वरील ‘झीरो’ चा आकडा कर्मचारी आपल्याला दाखवितात, आपल्यालाही समाधान असते. त्यानंतर केवळ आपल्याला जितके पेट्रोल भरवायचे आहे तो आकडा सेट केला जातो. पण त्याचसोबत पेट्रोल किंवा डीझेलचा चालू दर पंपाच्या मीटर मध्ये सेट केलेला नसतो. त्यामुळे पेट्रोल भरविताना हे सर्व सेट केलेले असतील ह्याकडे लक्ष द्यावे.

पेट्रोल पंप मीटर वर झीरो पहिला की निश्चिंत न होता मीटर कडे ही लक्ष द्यावे. मीटर अतिजलद गतीने तर पळत नाही ना, हे पाहावे. तसेच पेट्रोल पंप मीटर वरील रीडिंग कोणत्या आकड्यापासून सुरु झाले आहे ह्या कडे लक्ष द्यावे. जर अनेक आकडे एकदम ओलांडून मीटर पुढचे आकडे दाखवू लागला, तर मीटर मध्ये गडबड असू शकण्याचे ते लक्षण आहे. गाडीमध्ये पेट्रोल भरविताना आणखी काही गोष्टी लक्षात घेणे अगत्याचे आहे. आपण गाडी रिझर्व्हला लागेपर्यंत पेट्रोल भरविण्याची वाट पहात असतो. कधी कधी रिझर्व्ह साठा कितपत उरला आहे हेच आपल्या ध्यानात येत नाही. आणि मग गाडी अचानक रस्त्यातच बंद पडते. त्यामुळे गाडी रिझर्व्हला लागण्यापूर्वीच पेट्रोल भरवावे. तसेच पेट्रोलची टाकी अगदी वरपर्यंत भरवू नये.

Leave a Comment