विमानाच्या या कोपऱ्यात झोपतात एअर होस्टेस


विमान प्रवास करताना लोकांच्या मनात नेहमी एक प्रश्न घुटमळत असतो की ज्या विमानात आपल्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या एअर होस्टेस रात्री कुठे झोपत असतील? की त्या बसूनच आराम करत असतील? लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान त्या आराम कशा करत असतील? तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला देत आहोत आणि तुम्हाला दाखवणार आहोत की विमानाच्या कोणत्या कोपऱ्यात ते आराम करतात….

डेली मेलच्या वृत्तानुसार, प्रवाशी आणि फ्लाइंग एरियाव्यतिरिक्त फ्लाइटमध्ये अशा अनेक जागा असतात ज्याचा उपयोग फ्लाइट निर्माते आपल्या कर्मचाऱ्यांसाठी करतात.

या जागेला रेस्ट डिपार्टमेंटम्हणून ओळखले जाते, तिथे एअर होस्टेससह केबिन क्रूचे सदस्य देखील झोपतात.विमानाचा वरचा भाग नेहमी रिकामा असतो. मुख्य विभागाच्या कोपऱ्यात थोडी मोकळी जागा असते. ज्याचा उपयोग विश्रांतीसाठी केला जातो.

या ठिकाणी या दोन बेडच्यामध्ये पडदे लावलेले असतात. येथे चहासोबतच कॉफ़ी आणि नाश्त्याची देखील व्यवस्था केलेली असते.
एका विमानात सुमारे ८ बेड असतात. एवढेच नाही तर, विमान कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना झोपण्यासाठी कपडे देखील देतात.

Leave a Comment