सोन्याचे चिकनविंग्स खायचेत तर ७० हजार रुपये मोजा


खाणे हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग. मात्र तेथे जगभर समानता नाही. काही ठिकाणी लोकांना एकवेळचे जेवण मिळत नाही तेथे काही लोक एका वेळच्या जेवणासाठी हजारो रुपये उडविताना दिसतात. अमेरिकेच्या न्यूयॉर्क सिटी मध्ये द आईन्सवर्थ एनवायसी रेस्टॉरंट मध्ये असाच एक महागडा पदार्थ मिळतो. आणि तो अतिशय लोकप्रिय आहे.


आपण सोन्याची अंडी देणारी कोंबडी गोष्ट ऐकली आहे. पण सोन्याची कोंबडी कधी पाहिलेली नसेल. या रेस्टॉरंट मध्ये चक्क चोवीस कॅरेट सोन्याचा वापर करून तयार केलेले गोल्डन चिकन विंग्स विकले जातात. या डिशसाठी १ हजार डॉलर्स म्हणजे ७० हजार रुपये मोजावे लागतात आणि एका प्लेट मध्ये असे पाच विंग्स मिळतात. त्यात २०० डॉलर्स किमतीचे सोने वापरले जाते. ही दिश या रेस्टॉरंटच्या मेन्यूवर येताच रातोरात प्रसिद्धी पावली असून फूडगॉड नावाच्या एका व्यक्तिने ती तयार केल्याचे सांगितले जाते.


नेहमीच्या प्रमाणेच सुरवातीला दिसणाऱ्या या चिकन विंग्सवर सोन्याचे पाणी चढविले जाते. सोन्याच्या पाण्यात ते शिजले कि वरून सोन्याची पूड टाकली जाते. प्रथम १२ तास चिकन विंग्स लिंबू आणि बेलीफच्या पाण्यात भिजवून ठेवले जाते. त्यानंतर त्यावर आले आणि मिरची चोळून ते मुरविले जाते. नंतर बेक करून ते तळले जाते आणि त्यावर २४ कॅरेट सोन्याचे पाणी टाकून त्यावर सोन्याची पूड टाकली जाते अशी त्याची रेसिपी आहे. रेस्टॉरंटचा मालक सांगतो सोन्याला काहीच स्वाद नसतो पण सजावटीसाठी त्याचा वापर केला जातो आणि आमच्या कडे येणाऱ्या ग्राहकांची या डिशला खूपच पसंती मिळते आहे.

Leave a Comment