वाळलेल्या झाडात बनविले मोफत वाचनालय

library
घराबाहेर वाळून गेलेल्या मोठ्या झाडाचा वापर एका कलाकाराने सुंदररित्या केला असून या झाडाच्या खोडात मुलांसाठी मोफत वाचनालय बनविले आहे. अमेरिकेच्या इडाहो राज्यातील शार्ले एमिटेज हॉवर्ड या कलाकाराने अवघ्या ७३ डॉलर्स खर्चात हे काम केले आहे.

घराबाहेर एक मोठे झाड सुकून गेले आहे त्याचा काय वापर करावा असा विचार शार्ले करत होता. त्यातून त्याला एक कल्पना सुचली आणि त्याने झाडाचा बुंधा कापून त्याला कपाटाचा आकार दिला. यात छोटे एलइडी लाईट बसविले आणि बाहेर एक मोठा बल्ब बसविला. या कपाटात त्याने लहान मुलांसाठी गोष्टीची पुस्तके ठेवली आणि हे मोफत वाचनालय सुरु झाले. विशेष म्हणजे जगभरात अशी छोटी मोफत वाचनालये मोठ्या संखेने असून अशी ७५ वाचनालये नोंदली गेली आहेत. अर्थात शार्लेचे हे मोफत वाचनालय नक्कीच हटके आहे.

Leave a Comment