कबुतरांचे करा जरा कमीच लाड!

pigeon
पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात कबुतरांनी ‘पोस्टमन’ची भूमिका निभावल्याचे सर्वश्रुत आहे. मात्र हेच कबुतर अनेक गंभीर आजारांचे वाहक बनले आहेत. त्यांचे लाड जरा कमीच करा, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

कबुतरांमुळे दमा, अॅलर्जी, फुफ्फुस आणि श्वासाशी संबंधित जवळपास 60 प्रकारचे रोग होतात. याबाबत काळजी घेतली नाही, तर कबुतरांची विष्ठा आणि हवेत पसरणारे त्यांचे ‘मायक्रोफेदर्स’ यांमुळे प्राणघातक आजार होऊ शकतात.

कबुतरांना दाणे खाऊ घालने शुभ असते, अशी अनेकांची श्रद्धा आहे. मात्र कबुतरांना दाणे टाकणे आणि त्यांचे लाड करणे, यात अंतर आहे, असे दिल्ली विद्यापीठाच्या वल्लभभाई पटेल चेस्ट इन्स्टिट्यूट मधील नॅशनल सेंटर ऑफ रेस्पेरेटरी अॅलर्जीचे प्रमुख डॉ. राजकुमार यांनी सांगितले.

कबूतर आणि त्यांच्या जागा यांपासून दूर राहून आपण आरोग्याचे रक्षण करू शकतो. कबुतरांच्या विष्ठेत ‘हायपर सेन्सिटिव्ह निमोनाइटिस’ असतो. यामुळे लोकांना दमा, खोकला, श्वास भरून येणे अशा समस्या होऊ शकतात. वेळीच निदान आणि इलाज झाला नाही, तर हे घातक ठरू शकते, असे आमच्या रुग्णालयात केलेल्या संशोधनात दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.

कबुतरांच्या पंखांतून निघणाऱ्या ‘फीदर डस्ट’मुळे लोकांमध्ये संवेदनशील न्यूमोनिया किंवा बर्ड फन्सियर्स लंग्स हे आजार वाढत आहेत. दिल्लीतील प्रमुख चौकांमध्ये गोळा होणाऱ्या विष्ठेमुळे होणाऱ्या अॅलर्जीचा परिणाम 100 मीटर परीघातून जाणाऱ्या लोकांवर होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या अॅलर्जीबाबत केलेले संशोधन इंडियन जर्नल ऑफ इम्यूनोलॉजीमध्येही प्रकाशित झाले आहे.

कबुतरांच्या विष्ठेतून फुफ्फुसांचे आजार होऊ शकतात. धूळ, प्रदूषण, कबूतर आणि किड्यांच्या विष्ठेमुळे 200 पेक्षा अधिक वेगवेगळ्या अॅलर्जी होऊ शकतात. त्यावर लक्ष दिले नाही तर त्या दम्याला कारणीभूत ठरू शकतात. दिल्लीतील 30 टक्के लोकांना कोणती ना कोणती अॅलर्जी आहे, हेही पटेल चेस्ट इंस्टीट्यूटच्या संशोधनातून पुढे आली आहे.

कर्नाटकच्या के व्हेटर्नरी, अॅनिमल अँड फिशरीज यूनिव्हर्सिटीचे वेटरनेरी मायक्रोबायोलॉजिस्ट तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पक्ष्यांच्या खासकरून कबुतरांच्या विष्ठेत असणाऱ्या असंख्य रोगाणूंमुळे माणसांना किमान 60 प्रकारचे आजार होऊ शकतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment