प्रोव्हिडंट फंड खातेधारकांसाठी मोठी बातमी; 1 जूनपासून तुमच्या PF अकाऊंटवर लागू होणार हे नवीन नियम


नवी दिल्ली : EPFO ने आपल्या प्रोव्हिडंट फंडच्या खातेधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. तुमच्या PF खात्याबाबत 1 जून पासून नवीन नियम लागू होणार आहेत. खातेधारकाने आपले खाते आधार व्हेरिफाइड करायला हवे. तुम्ही जर असे न केले नाही, तर तुमचे नुकसान होऊ शकते. तसेच खात्यात येणारी नियमित रक्कम थांबू देखील शकते. त्यासाठी आपले PF खाते आधारशी लिंक करावे. UAN सुद्धा आधार व्हेरिफाइड असणे गरजेचे आहे.

EPFO ने हा नवा निर्णय सोशल सेक्युरिटी कोड 2020 च्या सेक्शन 142 अंतर्गत घेतला आहे. कंपन्यांना EPFOने निर्देश दिले आहेत की पीएफ खाते 1जूननंतर आधारला लिंक नसल्यास किंवा UAN आधार व्हेरिफाइड नसल्यास त्याचे ECR इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न भरला जाणार नाही. अशातच खातेधारकांनाचा कंपनीकडून मिळणारा हिस्सा थांबवला जाऊ शकतो.

अशा प्रकारे PF खात्याला Aadhaar शी करा लिंक

  • आपल्याला सर्वात आधी EPFOच्या अधिकृत संकेतस्थळावर www.epfindia.gov.inवर लॉग इन करावे लागेल.
  • त्यानंतर ऑनलाईन सर्व्हिसेस -> e-kyc portal -> link UAN Aadhaar वर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार आणि UAN अकाऊंट रजिस्टर मोबाईल नंबर अपलोड करावा
  • आता तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी नंबर येईल. ओटीपी सबमिट केल्यानंतर त्याखाली दिल्या गेलेल्या आधार बॉक्समध्ये आपला 12 डिजिटचा आधार नंबर भरावा लागेल. फॉर्म सबमिट करून तुमच्यासमोर प्रोसिड टू ओटीपी व्हेरिफिकेशन ऑप्शन येईल त्यावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुम्हाला पुन्हा एकदा आधार डिटेल्स व्हेरिफेकेशन करण्यासाठी आधारला लिंक असणाऱ्या मोबाईल नंबर किंवा ईमेलवर ओटीपी जनरेट करावा लागेल. व्हेरिफिकेशननंतर आपले आधार आपल्या पीएफ खात्याशी लिंक होईल.