अमेरिकेतील गन कल्चर पुन्हा चर्चेत, हत्यारे खरेदीत ९० टक्के वाढ

रेलयार्ड गोळीबारात १७ जणांचा जीव गेल्यावर अमेरिकेतील गन कल्चर पुन्हा चर्चेत आले आहे. गतवर्षी कॅपिटल हिल हिंसाचारानंतर अमेरिकेत हत्यार खरेदीत ९० टक्के वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. सर्वसामान्य नागरिक मशीनगन सुद्धा खरेदी करत असल्याचे दिसून आले आहे.

३३ कोटी लोकसंखेच्या या देशात खरेदी केलेल्या शस्त्रांची संख्या ३९ कोटींवर आहे. घराघरातून शस्त्रे दिसणे येथे आता नवलाची गोष्ट राहिलेली नाही. अनेक परिवार येणाऱ्या जाणाऱ्या मित्र मंडळीना खरेदी केलेल्या हत्यारांचे प्रदर्शन करून दाखवीत आहेत. अमेरिकेत कोणतेही आणि कितीही घातक हत्यार खरेदी करता येते. टेक्सास मधील एका परिवाराने १७० शस्त्रे खरेदी केली आहेत.

विशेष म्हणजे अमेरिकेत शस्त्र खरेदीत वाढ झाल्याची चिंता ब्रिटनला सतावते आहे. गेल्या दोन वर्षात ब्रिटन मध्ये ९०० पेक्षा जास्त घातक शस्त्रे जप्त करण्यात आली असून ही शस्त्रे अमेरिकेन परवान्यावर खरेदी करून आडमार्गाने ब्रिटन मध्ये आणली गेली असे सांगितले जात आहे.