जगात स्मोकर्सची संख्या वाढती- चीन, भारत आघाडीवर

वायूप्रदूषणाइतकेच धुम्रपान सुद्धा हानिकारक आहे. वारंवार या संदर्भात जनजागृती मोहिमा जगभर राबविल्या जातात, सिगरेट सारख्या वस्तूंवरील कर वाढविले जातात मात्र या मोहिमांचा फारसा उपयोग होत नसल्याचे नुकतेच एका पाहणी मध्ये आढळून आले आहे. २०१९ मध्ये धुम्रपानामुळे ८० लाख मृत्यू झाल्याची आकडेवारी आहे. नवीन रिसर्च नुसार मात्र धुम्रपान करणाऱ्यांमध्ये युवकांचे प्रमाण वेगाने वाढत चालले आहे.

१९९० नंतर पुढच्या ९ वर्षात धुम्रपान करणाऱ्यांच्या संख्येत १.५० दशलक्षानी वाढ झाली आहे. आता धुम्रपान करणाऱ्यांची संख्या १ अब्ज १० कोटी इतकी असून नव्याने धुम्रपान करणाऱ्यांमधील ८९ टक्के स्मोकर २५ च्या वयोगटातील आहेत. गेल्या तीन दशकात वास्तविक धुम्रपान कमी झाल्याचे दिसले असले तरी २० देशात पुरुष स्मोकर्सची संख्या वेगाने वाढली आहे तर १२ देशात महिला स्मोकर्सची संख्या वाढली आहे.

जगातील एकूण स्मोकर्सपैकी २/३ स्मोकर्स फक्त १० देशात आहेत. त्यात चीन आणि भारत आघाडीवर असून अन्य देशात इंडोनेशिया, अमेरिका, रशिया, बांग्ला देश, जपान, तुर्कस्तान, व्हियेतनाम, फिलीपिन्स या देशांचा समावेश आहे. चीन मध्ये दर तीन व्यक्तींमागे १ स्मोकर आहे. या अभ्यासात असे दिसून आले आहे की धुम्रपानामुळे होणाऱ्या विकारात हृदयरोगामुळे १७ लाख, पाल्मोनरी डिसीज मुळे १६ लाख, श्वास मार्ग, फुफ्फुस कॅन्सर मुळे १३ लाख तर स्ट्रोक मुळे १ लाखवार मृत्यू झाले आहेत.