किम जोंग उनला कबुतरे आणि मांजरांची भीती

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन कोणते आदेश कोणत्या वेळी जारी करेल याचा काहीही नेम नाही. आता किमने कबुतरे आणि मांजरे दिसता क्षणी त्यांना ठार करावे असे आदेश जनतेला जारी केले असून जे या आदेशांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे असे समजते.

करोना महामारीने जगभर धुमाकूळ घातला असला तरी उत्तर कोरीयातून करोना संदर्भातली काहीही माहिती अद्यापी जगासमोर आलेली नाही. उत्तर कोरियात करोनाचा एकाही रुग्ण नाही असे किम जोंगने पूर्वीच जाहीर केले आहे. मात्र आता चीन सिमेवरून येणारी कबुतरे किम जोंग साठी संशयाचे दूत बनली आहेत. तसेच मांजरे सुद्धा करोना साठी कारणीभूत ठरू शकतील अशी भीती त्याच्या मनात आहे. परिणामी उत्तर कोरियात सध्या काबुतरे आणि मांजरांचे जीव धोक्यात आले आहेत.

द सन च्या रिपोर्ट नुसार सीमाभागात राहणाऱ्या सर्व नागरिकांना कबुतरे आणि मांजरे दिसता क्षणी ठार करण्याचे आदेश जारी केले गेले आहेत. एका कुटुंबाकडे पाळलेले मांजर होते त्यांना २० दिवस कैदेत ठेवले गेल्याचे समजते. हे मांजर पूर्वीच मरण पावल्याचा खुलासा या कुटुंबाने केला मात्र तरीही त्यांना कैदेत टाकले गेले आहे. सीमा गस्ती पथकेही बाहेरून येणारी कबुतरे आणि मांजरे पकडण्याच्या कामी लागले आहेत असे समजते.