केंद्रीय मंत्र्यांचा आरोप; केजरीवालांनी केला तिरंग्याचा अवमान


नवी दिल्ली – कोरोना संकट काळात केंद्र सरकार व दिल्ली सरकार दरम्यान पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत. याच दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केंजरीवाल यांनी तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप केंद्रीयमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी केला. त्याचबरोबर या संदर्भात दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केंद्रीयमंत्र्यांनी पत्र देखील पाठवले आहे.

मुख्यमंत्री केजरीवाल यांची पत्रकार परिषद मी काही दिवसांपासून पाहत होतो, त्यांच्या पाठीमागे लावण्यात आलेल्या दोन ध्वजांमधील पांढऱ्या रंगावर हिरवी पट्टी वाढवली गेली आहे. यासंदर्भात मी अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले असून, या पत्राची प्रत मी उपराज्यपालांना देखील पाठवली असल्याचे केंद्रीय संस्कृती व पर्यटन राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी म्हटले आहे.

केंद्रीयमंत्री प्रल्हाद पटेल पत्रात म्हणतात, अरविंद केंजरीवाल यांच्या पत्रकार परिषदे दरम्यान पाठीमागे जे दोन तिरंगा ध्वज लावलेले असतात, त्यामध्ये पांढऱ्या रंगाचा भाग सोडून हिरव्या रंगाचा भाग वाढवण्यात आलेला आहे. यामध्ये गृहमंत्रालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करण्यात आले आहे. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे प्रल्हाद सिंह पटेल यांनी मागणी केली आहे की, त्यांनी यात सुधारणा करावी. याचबरोबर त्यांनी उपराज्यपाल अनिल बैजल यांना देखील पत्र पाठवून याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.