या बॉलीवूड कलाकारांनीही केले आहे गिनीज रेकॉर्ड

बॉलीवूड स्टार्स म्हणजे ग्लॅमर, लॅव्हीश लाईफस्टाईल असे समीकरण आहे. त्यामुळे हे सेलेब्रिटी नेहमीच चर्चेत असतात. त्यांना दरवर्षी कोणती ना कोणती पारितोषिके मिळत असतात. मग ते राष्ट्रीय पारितोषिक असेल, फिल्म फेअर अॅवॉर्ड असेल वा अन्य कोणते बक्षीस असेल. पण अनेकांना याची माहिती नसेल की बॉलीवूड मधील अनेक कलाकारांनी प्रतिष्ठित गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांचे नाव नोंदविले आहे. यात बिग बी पासून जुन्या काळातील खलनायिका म्हणून गाजलेल्या ललिता पवार यांच्या पर्यंत अनेकांचा समावेश आहे.

अमिताभ बच्चन यांचे नाव गिनीज मध्ये नोंदले गेले ते बॉलीवूडच्या १३ गायकांसोबत हनुमान चालीसा गाणारे एकमेव आणि पहिले बॉलीवूड कलाकार म्हणून. तर ललिता पवार यांनी सलग ७० वर्षे ७०० पेक्षा अधिक चित्रपटातून काम करून त्यांचे नाव गीजीज मध्ये नोंदविले. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी चित्रपट सृष्टी मध्ये पाउल टाकले होते. सलग ७० वर्षे चित्रपट काम करणाऱ्या त्या एकट्याचा अभिनेत्री आहेत.

किंग खान म्हणजे शाहरुखने २०१३ मध्ये सर्व कलाकारात एक वर्षात सर्वाधिक कमाई करणारा कलाकार म्हणून गिनीज मध्ये रेकॉर्ड केले आहे. त्याची कमाई या वर्षात २२० कोटी होती. कतरिना कैफ या अभिनेत्रीने सुद्धा २०१३ मध्ये एका चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेणारी कलाकार म्हणून रेकॉर्ड केले आहे. तिने एका चित्रपटासाठी त्यावेळी १० दशलक्ष डॉलर्स मानधन घेतले होते.

अभिषेक बच्चन यानेही गिनीज रेकॉर्ड केले आहे. दिल्ली सिक्स या चित्रपटाच्या प्रमोशन साठी १२ तासात १८०० किमी प्रवास आणि अनेक शहरात सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती लावणारा कलाकार म्हणून हे रेकॉर्ड नोंदविले गेले आहे.

पार्श्वगायक कुमार सानू यांनी गायलेली अनेक गाणी सुपरहिट आहेत. १९९३ मध्ये एका दिवसात २८ गाणी रेकॉर्ड केल्यामुळे त्यांचे नाव गिनीज मध्ये नोंदले गेले आहे. तर प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी २० पेक्षा जास्त भाषांत ११ हजाराहून अधिक गाणी गायली आहेत आणि याची नोंद गिनीज रेकॉर्ड मध्ये केली गेली आहे. अनेक चित्रपटात पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारलेले जगदीश राज यांनी १४४ चित्रपटात पोलीस भूमिका करून गिनीज मध्ये नाव नोंदविले आहे.

ब्लॉक ब्लास्टर ठरलेला, सर्वाधिक खर्चिक म्हणून गाजलेल्या बाहुबलीने अनेक पारितोषिके मिळविली. मात्र या चित्रपटाचे ५० हजार चौरस फुटाचे जे प्रचंड पोस्टर तयार केले गेले त्याची नोंद जगातील मोठे पोस्टर म्हणून गिनीज बुक मध्ये केली गेली आहे.