गुगल अँड्राईड १२ बग शोधा आणि ७ कोटी इनाम मिळवा

गुगलने नुकतेच अँड्राईड १२ ओएस व्हर्जन रिलीज केले आहे. मात्र अँड्राईड ओएस मध्ये अनेकदा बग मिळाल्याचा बातम्याही आल्या आहेत. त्यामुळे गुगलने बग शोधण्यासाठी बाउंटी प्रोग्राम चालविला असून या प्रोग्राम नुसार विविध सिस्टीम मध्ये बग शोधणाऱ्याना विविध रकमेची बक्षिसे जाहीर केली आहेत. गुगल सह सर्वच टेक कंपन्या अश्या प्रकारे बग शोधण्यासाठी बाउंटी प्रोग्राम चालवितात असे समजते.

गुगलने एओएसपी कोड बग, ओईएम कोड, कर्नेल, सिक्युअर इलेमेंट कोड, ट्रस्ट झोन ओएस, मोड्युलस साठी ही बक्षिसे जाहीर केली आहेत. १८ मे ते १८ जून दरम्यान अँड्राईड बग शोधणाऱ्यास ५० टक्के बोनस दिला जाणार आहे. फोनच्या लॉक स्क्रीनला बायपास केल्यास १ लाख डॉलर्स, पिक्सल टायटन बग साठी १ लाख डॉलर्स, सिक्युअर इलेमेंट, कर्नेल आणि ट्रस्टेड एग्झीक्युटीव्ह साठी प्रत्येकी अडीच लाख डॉलर्स, प्रीविलेज्ड प्रोसेस साठी १ लाख डॉलर्स असे इनाम दिले जाणार आहे. गुगलचे अँड्राईड बीटा व्हर्जन सध्या काही युजर्ससाठी उपलब्ध असून स्टेबल व्हर्जन या वर्षअखेर येणार आहे.