डॉक्टरांचा ‘बाप’ काढणाऱ्या रामदेव बाबांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल


नवी दिल्ली – योगगुरू रामदेवबाबा यांनी कोरोनाकाळात अ‍ॅलोपॅथी व डॉक्टरांवर केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्याविरोधात आता इंडियन मेडिकल असोसिएशनने गुन्हा दाखल केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून योगगुरु रामदेवबाबा चर्चेत आहेत. रामदेवबाबा यांना अशी वक्तव्य न करण्याचा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही सल्ला दिला आहे.

साथरोग कायदा, १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा,२००५ अंतर्गत रामदेव बाबा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर रामदेवबाबांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून देखील रामदेवबाबा यांच्यावर टीका होत आहे.

ते व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपल्या अटकेवर प्रतिक्रिया देताना त्यांचा बाप सुद्धा मला अटक करू शकत नसल्याचे म्हणत आहेत. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ कधीचा आहे. याबाबत माहिती मिळाली नाही. पण सोशल मीडियावर हा व्हिडिओ ट्विट करुन नेटकऱ्यांनी रामदेवबाबा यांना लक्ष्य केले आहे.

रामदेवबाबा म्हणाले, लोक कधीकधी सोशल मीडियावर रामदेवबाबा यांना अटक करण्याचा ट्रेंड चालवतात तर कधी रामदेवबाबा ठग असल्याचे ट्रेंड चालवतात. चालू द्या, पण आता आपण हे गुण देखील शिकलो आहोत आणि आम्ही जे लोक जो ट्रेंड चालवितात, तो देखील शीर्षस्थानी असतो. रामदेवबाबा यांच्या या व्हिडिओवर काही नेटकऱ्यांनी केंद्र सरकारलाही ट्रोल केले आहे. स्वामी रामदेव हे भाजप आणि पंतप्रधान यांच्या जवळचे असल्यामुळे, असे वक्तव्य करत असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.