मुन्नाभाई संजय दत्तला मिळाला युएईचा गोल्डन व्हिसा

बॉलीवूड मध्ये मुन्नाभाई म्हणून लोकप्रिय ठरलेला संजय दत्त याला युएईचा गोल्डन व्हिसा मिळाला आहे. असा व्हिसा मिळविणारा तो पहिला बॉलीवूड कलाकार असल्याचे सांगितले जात आहे. स्वतः संजय दत्त यांनीच ही बातमी शेअर केली असून इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर पासपोर्ट सह फोटो शेअर केला आहे.

युएईचा गोल्डन व्हिसा म्हणजे युएई मध्ये संबंधित व्यक्ती १० वर्षे राहू शकते. यापूर्वी असा व्हिसा उद्योजक, व्यावसायिक, गुंतवणूकदार याना दिला जात असे. त्यानंतर तो डॉक्टर व तत्सम क्षेत्रातील प्रोफेशनल व्यक्तींना देण्याची तरतूद केली होती. आता या नियमात बदल केल्याने संजय दत्त याना सुद्धा हा व्हिसा मिळाला आहे.

संजय दत्त या व्हिसा संदर्भातला फोटो शेअर करताना लिहितो, मेजर जनरल मोहम्मद अल मारी यांच्या सोबत फोटो. मारी दुबई मध्ये जनरल डायरेक्टरेट ऑफ रेसिडेन्सी आणि फॉरीन अफेअर्सचे महासंचालक आहेत. कॅप्शन मध्ये संजय दत्त यांनी मारी यांच्या उपस्थितीत गोल्डन व्हिसा घेताना सन्मान झाल्याचा फील आहे असे म्हटले आहे. संजय दत्त यांची मुलगी त्रीशाला हिने वडिलांच्या पोस्ट वर कॉमेंट करताना,’ डॅडी मस्त दिसतोय, लव्ह यु’. असे म्हटले आहे.