अमेझॉनने ६११ कोटी मध्ये केली ९७ वर्षे जुन्या एमजीएम स्टुडिओजची खरेदी

ई कॉमर्स कंपनी अमेझॉनने ९७ वर्षे जुना फिल्म स्टुडीओ एमजीएम शी करार करून या कंपनीचे अधिग्रहण केले आहे. करारानुसार ८.४५ अब्ज डॉलर्स म्हणजे ६११ कोटी रुपयात ही खरेदी केली गेली आहे. गेली दहा वर्षे हा स्टुडीओ चित्रपट निर्मिती व्यवसायात आहे.

मार्कस लोये व लुईस बी मेयर यांनी १७ एप्रिल १९२४ रोजी या स्टुडीओची स्थापना केली होती. मेट्रो गोल्डविन मेअरच्या लायब्ररीत ४ हजाराहून अधिक चित्रपट आणि १७ हजाराहून अधिक टीव्ही शो आहेत. बेसिक इन्स्टिंक्ट, जेम्स बॉंड, मूनस्ट्रक, क्रिड अश्या अनेक क्लासिक चित्रपटांचा त्यात समावेश आहे. अमेझॉनने एमजीएमला अधिक बळकट बनविण्याचा निर्णय घेतला आहे.

जगातील सर्वात मोठी टेली.कंपनी एटी अँड टी ने नवीन मिडिया दिग्गज बनण्याच्या हेतूने वॉर्नर मिडियाचे डिस्कव्हरी सह विलीनीकरण करण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेझॉनच्या एमजीएम अधिग्रहणाला विशेष महत्व मिळाले आहे.