सॅमसंग  झेड फोल्ड ३ ची फिचर्स लिक

भारतीय बाजारात दोन नंबर मूल्याचा असलेला स्मार्टफोन ब्रांड सॅमसंगने नेक्स्ट जनरेशन फोल्डेबल स्मार्टफोन झेड फोल्ड थ्री लवकरच लाँच करण्यात येत असल्याचे संकेत दिले असतानाचा या फोनची फिचर्स लिक झाली आहेत. पॉप्युलर टिप्स्टर, अॅट फ्रंटट्रॉन ने सॅमसंग चा आगामी फोल्डेबल स्मार्टफोन अंडरडिस्प्ले कॅमेऱ्यासह असेल असे म्हटले आहे.

या फोनला दोन फ्रंट कॅमेरे आहेत आणि त्यातील १० एमपीचा कॅमेरा अंडर डिस्प्ले असल्याचे आणि रिअरला क्वाड कॅमेरा सेट अप असल्याचे लिक मध्ये म्हटले गेले आहे. रिअर कॅमेरा सेटअप मध्ये प्रायमरी कॅमेरा १६ एमपीचा तर १२-१२ एमपीचे अन्य तीन सेन्सर आहेत. त्यात अल्ट्रावाईड, टेलेफोटो, डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. या फोनला ७.५ इंची डिस्प्ले एस पेन सपोर्ट सह दिला जाईल.

या फोल्डेबल स्मार्टफोन साठी स्नॅपड्रॅगन ८८८  फाईव्ह जी प्रोसेसर, १२ जीबी रॅम, ५१२ जीबी स्टोरेज, फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करणारी बॅटरी असेल असेही समजते. हा फोन साधारण १ लाख ५० हजार रुपये किमतीच्या रेंज मध्ये येईल.