रॉशचे करोनावरील कॉकटेल औषध सोमवारी लाँच होणार

रॉश आणि भारतीय कंपनी सिप्ला यांच्या सहकार्याने करोना साठी येत असलेले कॉकटेल औषध सोमवारी लाँच केले जात असून या औषधाच्या एका डोसची किंमत ५९७५० रुपये असेल असे समजते. हायरिस्क रोग्यांमध्ये कोविड १९ च्या हलक्या किंवा मध्यम लक्षणात या अँटीबॉडी कॉकटेल औषधाचा वापर केला जात आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांना करोनची लागण झाली होती तेव्ह्या त्यांच्यावर याच औषधाचे उपचार केले गेले होते असे सांगितले जात आहे.

या औषधाच्या १२०० मिलीग्राम मध्ये ६०० मिलीग्राम CASIRIVIMAB व ६०० मिलीग्राम  IMDEVIMASLS असे मिश्रण असून या मल्टी डोस पॅकची किंमत १,१९,५०० रुपये आहे. एका पॅक मध्ये दोन रुग्णांवर उपचार होऊ शकतात. या औषधाची पहिली बॅच उपलब्ध केली गेली आहे. दुसरी बॅच जून मध्यापर्यंत येणार असून त्याचा लाभ २ लाख रुग्णांना होऊ शकणार आहे.

हे औषध हॉस्पिटल्स आणि करोना उपचार केंद्राच्या माध्यमातूनच मिळणार आहे. भारताने या औषधाच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली असून यापूर्वी अमेरिका आणि युरोपीय देशांनी सुद्धा या औषधाच्या वापरास परवानगी दिली आहे.