टोल प्लाझावर मोठी रांग असेल तर टोल न देता जाऊ शकणार वाहने

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण म्हणजे एनएचएआय ने राष्ट्रीय महामार्गावर टोल प्लाझा जवळ गर्दीच्या वेळी १०० मीटर पेक्षा अधिक लांबीची रांग असेल तर वाहने टोल न भरता जाऊ शकतील असे स्पष्ट केले आहे. प्राधिकरणाने टोल नाक्यानी गर्दीच्या वेळी प्रती वाहन १० सेकंद सर्विस टाईम सेट करावा असे आदेश जारी केले आहेत. १०० मीटर पेक्षा अधिक लांब रांग असेल तर वाहनांना विना टोल परवानगी दिली जावी असेही आदेश दिले गेले आहेत.

सर्व वाहनांना फास्ट टॅग बंधनकारक केल्यामुळे टोल प्लाझा वरील वेटिंग टाईम कमी झाला आहे. पण काही कारणाने वाहनाची रांग वाढली तर बुथपासून १०० मीटरच्या आत असलेली वाहने टोल न घेता सोडली जाणार आहेत. त्यासाठी १०० मीटर वर पिवळी रेषा आखली जाईल. यातून फास्ट टॅग घेण्यास प्रोत्साहन मिळेल असेही सांगितले जात आहे.