शूजच्या स्पॉर्न्सरशिपसाठी झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा फलंदाज रायन बर्लने एक ट्वीट केल्यानंतर तो चर्चेत आला होता. त्यानंतर बर्लला पुमाने शूज पाठवत स्पॉर्न्सरशिपसाठी मदत केली. पण, आता मोठ्या कारवाईला बर्लला सामोरे जावे लागू शकते. बर्लविरूद्ध झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड शिस्तभंगाची कारवाई करू शकते. त्यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीवरही परिणाम होऊ शकतो.
ट्वीटरच्या माध्यमातून शूजसाठी मदत मागणाऱ्या झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूवर होणार कारवाई?
याप्रकरणी माहित देताना स्थानिक पत्रकार अॅडम थेओ म्हणाले, रायन बर्लच्या ट्विटवर झिम्बाब्वे क्रिकेटमधील काही लोक रागावले आहेत. त्यांनी लिहिले, मला सांगितले आहे, की रायनवर झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डामध्ये काही लोक रागावले आहेत. त्यांना असे वाटते, की यामुळे मंडळाची प्रतिमा कलंकित झाली आहे. रायनवर हे सदस्य शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करीत आहेत. हे झिम्बाब्वे क्रिकेटसाठी खूप कठीण पाऊल असेल. बंद दाराच्या मागून त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. कदाचित त्याला संघातून वगळण्यात येईल. मला आशा आहे, की मी चुकीचा सिद्ध होईन.
सोशल मीडियाद्वारे बर्लने शूजसाठी प्रायोजक मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती. त्याने आपली कळकळ ट्विटरद्वारे व्यक्त केली होती. आम्हाला प्रायोजक मिळेल का, जेणेकरून प्रत्येक मालिकेनंतर आम्हाला आमचे शूज चिकटवावे लागणार नाहीत, असे बर्लने म्हटले होते. पुमा (PUMA) कंपनी बर्लच्या या विनंतीनंतर त्याच्या मदतीला धावली. पुमाने बर्लला स्पॉन्सरशिप दिली असून आता शूज चिकटवायची गरज नसल्याचे कंपनीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले होते.