जगातील पहिला करोना लस डोस घेतलेल्या शेक्सपिअरचे निधन

जगात सर्वप्रथम करोना लसीकरण सुरु झाल्यावर पहिला डोस घेतलेल्या विलियम शेक्सपिअर या पुरुषाचे ८१ व्या वर्षी निधन झाले आहे. ब्रिटीश मिडीयाने मंगळवारी शेक्सपिअर यांचे अन्य आजाराने निधन झाल्याचे म्हटले आहे. बिल नावाने प्रसिद्ध असलेले शेक्सपिअर यांचे कोवेन्ट्री रुग्णालयात २० मे रोजी निधन झाले. त्यांनी फायझर बायोएनटेकची कोविड लस घेतली होती.

गतवर्षी ८ डिसेंबरला शेक्सपिअर जगभर प्रसिद्ध झाले ते वॉरवीकशायरच्या कोवेन्ट्री विद्यापीठ इस्पितळात करोना लसीचा पहिला डोस घेणारे म्हणून. अर्थात करोना लस घेणारे जगातील ते दुसरी व्यक्ती होते कारण त्यांच्या पूर्वी काही मिनिटे अगोदर ९१ वर्षीय मार्गारेट या महिलेला पहिला डोस दिला गेला होता. शेक्सपिअर करोना लसीचा पहिला डोस घेणारे पुरुष ठरले होते.

रोल्स रॉयल या नामवंत कार उत्पादक कंपनीत शेक्सपिअर यांनी कर्मचारी म्हणून काम केले होते. त्यांचा जवळचा मित्र जेन इनस याने सर्वानी लवकरात लवकर करोना लस घेणे हीच शेक्सपिअर यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे म्हटले आहे.