आरोग्य सेवा क्षेत्रावर सायबर हल्ला- एफबीआयचा सावधानतेचा इशारा

अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे एफबीआयने जगभरात आरोग्य सेवा माहिती तंत्र क्षेत्रावर सायबर हल्ले होऊ लागल्याचे सांगून सावधानतेचा इशारा दिला आहे. जग करोना महामारीशी झुंज देत असतानाच्या कठीण परिस्थितीत आरोग्य सेवा क्षेत्रावरc झाला असल्याचे उघडकीस आले आहे. सध्या अमेरिकेच्या फ्लोरिडा, टेक्सास आणि आयरलंड आरोग्य सेवांवर असे सायबर हल्ले झाले असून त्यात रुग्णाचा तसेच अन्य डेटा चोरून त्याबद्दल खंडणी मागितली जात आहे.

अश्या केसेस मध्ये खंडणी दिली नाही तर हा डेटा दुसऱ्यांना विकला जातो. आरोग्य सेवेशी संबंधित डेटा संवेदनशील व खासगी माहिती असलेला असतो. त्यामुळे हॅकर्सने खंडणी मिळविण्यासाठी हा नवा मार्ग शोधला असल्याचे एफबीआयचे म्हणणे आहे. कांटी रेनसमेवयर असे हल्ले करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोग्य सेवा देणाऱ्या क्षेत्रासाठी हा नवा धोका असल्याचे एफबीआयचे म्हणणे आहे.