टीक-टॉक अकाऊंटवर बंदी घातल्यामुळे पाक सरकारवर संतापली मिया खलिफा


या आधी दोन वेळा पाकिस्तानने टीक-टॉक अ‍ॅपवर बंदी आणली होती आणि ती पुन्हा हटवली. टीक-टॉक अ‍ॅप सेन्सॉर करण्यासाठी पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन अथॉरिटीने (PTA) नव्या पद्धतीचा अवलंब सुरु केला आहे. यानुसार ठराविक व्यक्तीच्या अकाऊंटवर बंदी आणली जात आहे. यातच आता माजी पॉर्न स्टार मिया खलिफाच्या टीक-टॉक अकाऊंटवर बंदी आणली आहे.

पीटीएने कोणतीही अधिकृत घोषणा न करता मिया खलिफाचे टीक-टॉक अकाऊंट बंद केले आहे. पीटीएने या मागचे कोणतही कारण स्पष्ट केलेले नाही. मियाचे अकाऊंट बंद झाल्यानंतर तिच्या चाहत्यांनी ट्विटरवर गोंधळ घातला. मियाच्या टीक-टॉक अकाऊंटवर कंन्टेट न दिसल्यामुळे त्यांनी ट्विटवरुन प्रश्न उपस्थित केले.

मियाने अकाऊंट बंद झाल्यानंतर ट्विटरवरुन एक ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या टीक-टॉक अकाऊंटवर बंदी घातल्यामुळे पाकिस्तानबद्दल आवाज उठवला पाहिजे. माझे सर्व टीक-टॉक व्हिडीओ मी चाहत्यांसाठी ट्विटरवर शेअर करत असल्याचे ट्विट मियाने केले आहे. तर अनेकांनी मियाच्या या ट्विटचे समर्थन करत पीटीएच्या कारवाईवर आक्षेप घेतला आहे.

अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरुन मियाचे समर्थन केले आहे. पाकिस्तान सरकार इतर महत्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत मियाच्या बंदीकडे जास्त लक्ष देत असल्याचा आरोप अनेक नेटकऱ्यांनी केला आहे. या आधी मिया खलिफाने सोशल मीडियाच्या माध्यमातून देश-विदेशातील अनेक घडामोडींवर तिचे मत व्यक्त केले आहे.