महानगरपालिकेने कोरोना काळात मास्क न घातलेल्या मुंबईकरांकडून वसूल केला 55 कोटी 56 लाख 21 हजार 800 रुपये दंड


मुंबई : मुंबई महानगरपालिकेने कोरोना संकटात कोरोना संबंधींचे नियम मोडणाऱ्यांवर कडक मुंबईकरांवर कारवाई केली आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मुंबईकरांकडून महानगरपालिका, पोलीस आणि रेल्वेने मिळून 55 कोटींपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याबद्दल दंड वसूल करण्यात आला आहे. ही दंडाची रक्कम गेल्यावर्षी एप्रिल महिन्यापासूनची आहे.

23 मे पर्यंत मुंबई महानगरपालिकेने 55 कोटी 56 लाख 21 हजार 800 रुपये दंड वसूल केला आहे. त्यात मुंबई पोलिस आणि रेल्वेने वसूल केलेल्या दंडाचा समावेश आहे. महानगरपालिकेअंतर्गत 23 मे पर्यंत अधिकाऱ्यांनी 48 कोटी 28 लाख 80 हजार 800 रुपये दंड वसूल केला आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या गस्ती दरम्यान 6 कोटी 77 लाख 01 हजार 800 रुपये दंड वसूल केला आहे. कोविड प्रकरणात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणून रेल्वेला मानले जाते. रेल्वेने देखील 50 लाख 39 हजार 200 रुपये दंड वसूल केला आहे.

कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मुंबईकरांकडून वसूल केलेली दंडाची रक्कम लसीकरणासाठी वापरली, तर लाखो नागरिकांचे लसीकरण होईल. कोरोना लसीचे सरकारी दर पाहिले तर सीरम इन्स्टिट्युटची कोव्हिशिल्ड लस 300 रुपयांना तर भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस 400 रुपयांना मिळत आहे. दोन्ही लसीची सरासरी किंमत 350 रुपये होते. दंडाची रक्कम 55,56,21,800 रुपयांमध्ये 350 रुपयांनी कोरोना लसीचे 15 लाख 87 हजार 490 डोस उपलब्ध होऊ शकतील.