हे श्रीमंत क्रिकेटर आहेत सरकारी नोकर 

क्रिकेट मध्ये खेळाडू मजबूत पैसे मिळवितात. भारतीय क्रिकेटपटू या बाबतीत आघाडीवर आहेत. अत्यंत गरिबीतून आलेले खेळाडू सुद्धा बघता बघता कोट्याधीश झालेले दिसतात. पण आपल्या टीम मधील काही खेळाडू कोट्याधीश असूनही सरकारी नोकरी, देश सेवाही करतात. अश्या काही खेळाडूंची माहिती क्रिकेट प्रेमी वाचकांसाठी देत आहोत.

भारताला १९८३ मध्ये पहिला वर्ल्ड कप मिळवून देणारे कपिल देव यांनी क्रिकेट संन्यास घेऊन बरीच वर्षे झाली. मात्र ते भारतीय सेनेत मानद लेफ्टनंट कर्नल म्हणून कार्यरत आहेत. भारतीय टेस्ट टीम मधील वेगवान गोलंदाज उमेश यादव स्पोर्ट्स कोटा मधून रिझर्व बँकेत नोकरी करत आहे.

टीम इंडियाच्या प्रसिद्ध स्पिनर हरभजनसिंग याने क्रिकेट मधून निवृत्ती घेतलेली नाही. मात्र पंजाब पोलीस मध्ये त्याला डीएसपी पद दिले गेले असून याने देशसेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला भारतीय हवाई सेनेत मानद ग्रुप कॅप्टन पद दिले गेले आहे.

टीम इंडियाचा लेग स्पिनर यजुवेंद्र चहल इन्कमटॅक्स विभागात इन्स्पेक्टर आहे तर टी २० वर्ल्ड कप मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये भारताला विजय मिळवून देणारा जोगिंदर सिंग हरियाना पोलीस मध्ये डीएसपी पदावर कार्यरत आहे. टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कप्तान, दोन विश्वकप विजेता आणि चँपियन ट्रोफी विजेता कप्तान एमएस धोनी भारतीय सेनेत मानद लेफ्टनंट कर्नल पदावर नियुक्त आहे.