रणवीरसिंगने केली लोम्बर्गिनी युर्स पर्ल कॅप्सूल कारची खरेदी

बॉलीवूड स्टार रणवीरसिंग याच्या कार कलेक्शन मध्ये आणखी एका अलिशान कारची भर पडली आहे. त्याने नुकतीच लोम्बर्गिनी युर्स पर्ल कॅप्सूल एडिशन कारची खरेदी केली असून या कारची किंमत ३ कोटी ४३ लाख रुपये आहे. कारची डिलीव्हरी रणवीरला मुंबईत देण्यात आली. रणवीर आणि त्याची पत्नी दीपिका पादुकोने नुकतेच बंगलोर हून मुंबईला आले आहेत.

रणवीरकडे लाल रंगाची लोम्बर्गिनी युर्स कार आहेच. नवीन लोम्बर्गिनी युर्स पर्ल कॅप्सूल ही एक दमदार एसयूव्ही आहे. ड्युअल टोन इंटिरीअर कारचा बेसिक कलर ऑरेंज असून त्याला ब्लॅक रुफ आहे. या कारला व्ही एट ट्विन टर्बोचार्ज्ड इंजिन असून ० ते १०० किमीचा वेग ती ३.६ सेकंदात घेते. भारतात ही कार नुकतीच लाँच झाली आहे.

बॉलीवूड सेलेब्रिटी मध्ये लोम्बर्गिनी कारची लोकप्रियता वाढती आहे. कार्तिक आयर्नने नुकतीच लोम्बर्गिनी खरेदी केली आहे. रोहित शेट्टी, आदर पूनावाला, मुकेश अंबानी, यांच्या कडेही लोम्बर्गिनी आहेत. करोना काळात सुद्धा लोम्बर्गिनीने जानेवारी ते मार्च महिन्यात जगभरात लोम्बर्गिनी युर्स पर्ल कॅप्सूलची १३८२ युनिट विकली आहेत.