बेलारूस राष्ट्रपतीनी पत्रकाराच्या अटकेसाठी केले विमान हायजॅक

बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेंको यांनी रविवारी एका पत्रकाराला अटक करण्यासाठी ग्रीसच्या अथेन्स हून लिथुआनीयाच्या विलिनीयस येथे जाण्यासाठी निघालेले रेयानएअर चे प्रवासी विमान, लढाऊ विमाने पाठवून हायजॅक केल्याची घटना घडली आहे. हायजॅक केलेले हे विमान जबरदस्तीने मिन्स्क विमानतळावर उतरविले गेले आणि त्यातून प्रवास करत असलेल्या २६ वर्षीय रोमन प्रोटोसवीक या पत्रकाराला आणि त्याच्या २३ वर्षीय सोफिया सापेगा या रशियन मैत्रिणीला अटक करण्यात आली असे समजते. या विमानाच्या पाठलागावर गेलेल्या मिग २९ लढाऊ विमानांनी गोळ्या झाडण्याची धमकी वैमानिकला दिली असेही स्पष्ट झाले आहे.

हायजॅक केलेल्या बोईंग ७३७ मध्ये १७० हून अधिक प्रवासी होते आणि त्यांना या प्रकारामुळे खुपच त्रास सहन करावा लागला. रोमन लुकाशेंको यांचा विरोधक असून या हुकुमशहा राष्ट्रपतीविरोधात सतत टीका करत असतो. गतवर्षी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत लेकाशेंको विजयी झाल्यावर त्या विरोधात रस्त्यांवर विरोध प्रदर्शनाचे आयोजन केल्याचा आरोप रोमन यांच्या विरोधात आहे. लुकाशेंको याना युरोपचा शेवटचा हुकुमशहा म्हटले जाते. सत्तेत राहण्यासाठी कायद्यात हवे तसे बदल करण्याबाबत त्यांची ख्याती असून आंतरराष्ट्रीय समुदायात लुकाशेंको यांच्या विजयाला मान्यता मिळालेली नाही.

लुकाशेंडो यांच्या पत्रकार अटक कृतीचा जगभरातून निषेध केला जात आहे.