टेक्नो स्पार्क ७ प्रो स्मार्टफोन भारतात दाखल

ग्लोबल स्मार्टफोन ब्रांड टेक्नो स्पार्कने सेवन सिरीज मधील नवा स्मार्टफोन टेक्नो स्पार्क सेवन प्रो भारतात सादर केला असून ई कॉमर्स कंपनी अमेझॉन इंडिया वर विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. स्पार्क ७ लाईन अप मधला हा तिसरा स्मार्टफोन आहे.

हा फोन ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज, १२८ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज अश्या तीन स्टोरेज व्हेरीयंट मध्ये मिळणार आहे. चार कलर ऑप्शन आहेत. फोन साठी ६.६ इंची फुल एचडी प्लस डिस्प्ले, पंचहोल डिस्प्ले सपोर्ट सह दिला गेला आहे. रिअर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर असून टॉप लेफ्ट कॉर्नरला फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. हा कॅमेरा ८ एमपीचा आहे.

रिअर कॅमेरा सेटअप मध्ये ४८ एमपी ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी ५ हजार एमएएचची बॅटरी, अँड्राईड ११ ओएस अशी अन्य फिचर्स असून फोनची किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी आहे.