नवी दिल्ली – आपल्या लूक्समुळे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली फार चर्चेत असतो. त्याचे लग्नापूर्वीचे विविध हेअस्टाईलचे आणि बिअर्डचे फोटो अनेकांना घायाळ करत होते. विराट आपल्या संघासह म्हणजेच टीम इंडियासह आयपीएल २०२१च्या स्थगितीनंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. पण, विराट या दौऱ्यापूर्वी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. विराटचा एक नवीन लूक ट्विटरवर व्हायरल होताना दिसत आहे.
सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे विराट कोहलीचा ‘किलर’ लूक
#ViratKohli's new look for WTC ❤️ pic.twitter.com/kQXQq32twI
— Priyamudan Kolanchi (@kolanchip3611) May 24, 2021
ट्विटरवर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादानुसार विराटने हा नवीन लूक आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी केल्याचे म्हटले जात आहे. भारतीय संघ येत्या २ जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. तत्पूर्वी टीम इंडियाचे खेळाडू मुंबईत क्वारंटाईन कालावधीत असून ते इंग्लंडला पोहोचल्यानंतरही त्यांना ३ दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीत राहावे लागेल.
विराट कोहलीने इंग्लंड दौऱ्यापूर्वी कोरोना लस टोचून घेतली. त्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून लस घेतानाचा फोटो पोस्ट केला आहे. कृपया लस घ्या, सुरक्षित राहा, असे विराटने सांगितले. विराटव्यतिरिक्त टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने आपल्या पत्नीसह कोरोनाची लस घेतली. त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत कोरोना योद्ध्यांचे आभार मानले. याआधी संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांनीही कोरोनाची लस घेतल्याचे सांगितले होते.