आता ऑक्सिमीटरशिवाय चेक करता येऊ शकते ऑक्सिजन लेवल


नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान अचानक पल्स ऑक्सिमीटरबाबत मोठी चर्चा सुरू झाली. शरीरातील ऑक्सिजन लेवल तपासण्यासाठी हे छोटेस डिव्हाईस महत्वपूर्ण मदत करते. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांना वेळोवेळी आरोग्य विभागाकडून ऑक्सिजन लेवल विचारली जाते, जेणेकरुन ऑक्सिजन लेवल कमी झाल्यास, वेळीच रुग्णाला रुग्णालयात आणले जाऊ शकते. त्यामुळेच पल्स ऑक्सिमीटरची मागणी वाढली. पण आता बाजारात ऑक्सिमीटरचीही कमतरता जाणवत असल्याची माहिती आहे.

ऑक्सिमीटर आजच्या काळात घरात असणे फायद्याचे ठरत आहे. ऑक्सिमीटरच्या वाढत्या मागणीमुळे किंमतीत वाढ झाली आहे. पण आता एक असे अ‍ॅप डेव्हलप करण्यात आले आहे, ज्यामुळे ऑक्सिजन लेवल, ऑक्सिमीटरशिवाय चेक करता येऊ शकते. एक मोबाईल अ‍ॅप डेव्हलप कोलकातामधील हेल्थ स्टार्टअपने केले आहे, जे ऑक्सिमीटरच्या जागी वापरता येऊ शकते.

CarePlix Vital असे या मोबाईल अ‍ॅपचे नाव आहे. या अ‍ॅपद्वारे युजरची ब्लड ऑक्सिजन लेवल, पल्स आणि रेसप्रेशन रेट्स मॉनिटर करण्याचे काम केले जाते. स्मार्टफोनच्या रिअर कॅमेरा आणि टॉर्चद्वारे ही टेक्नोलॉजी काम करणार आहे.

युजरला या मोबाईल अ‍ॅपचा वापर करण्यासाठी स्मार्टफोनच्या रिअर कॅमेरा आणि फ्लॅशलाईटवर हाताचे बोट ठेवावे लागेल. काही सेकंदाच ऑक्सिजन सॅच्युरेशन (SpO2), पल्स आणि रेसप्रेशन लेवल डिस्प्लेवर दिसते. गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप स्टोरवरुनही CarePlix Vital फ्रीमध्ये डाउनलोड केले जाऊ शकते.

इंडियन एक्सप्रेसला CareNow Healthcare चे को-फाउंडर सुभब्रत पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि पल्स रेट तपासण्यासाठी लोकांना पल्स ऑक्सिमीटर डिव्हाईसची गरज भासते. परंतु आम्ही या मोबाईल अ‍ॅपमध्ये इंटरनल टेक्नोलॉजी फोटोप्लेथिस्मोग्राफीचा (PPG) वापर केला आहे.