तुमच्या ड्रेसिंग सेन्सचा आहे तुमच्या व्यक्तिमत्वाशी थेट संबंध


नॉर्थ-वेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या वतीने केल्या गेलेल्या एका अभ्यासामध्ये एखाद्या व्यक्तीच्या ड्रेसिंग सेन्स चे थेट कनेक्शन त्याच्या व्यक्तिमत्वाशी आणि बुद्धिमत्तेशी असल्याचे निदान करण्यात आले आहे. डॉक्टरचा किंवा वैमानिकाचा पेहराव घातल्याने एखादी व्यक्ती जास्त आत्मविश्वासाने वागू लागते असे या प्रबंधामध्ये म्हटले आहे. डॉक्टर आणि वैमानिक ही दोन कार्यक्षेत्रे बुध्दिमान असणाऱ्या व्यक्तींसाठी जास्त योग्य असल्याचे या अभ्यासामध्ये म्हटले आहे.

आणखी एका प्रबंधानुसार वर्क आउट करतानाचे कपडे घातल्याने शरीरामध्ये सतत उत्साह आणि ताकद राहते असे निदान करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सतत बिझिनेस सूट वापरणाऱ्या व्यक्ती स्वतःचा अधिकार दर्शविणाऱ्या असतात असे म्हटले गेले आहे. एखादी व्यक्ती करिता असलेल्या पेहरावावरून त्या व्यक्तीचा स्वभाव, त्याचे व्यक्तिमत्व कसे असू शकेल याचे रोचक अंदाज बांधण्यामध्ये वैज्ञानिक पुष्कळ अंशी यशस्वी झाले आहेत. त्यांच्या मते एखादी व्यक्ती करीत असलेला पेहराव तिच्या आयुष्याला प्रभावित करीत असतो. म्हणूनच अनेक प्रसंगांसाठी विशेष ड्रेस कोड आखले गेले आहेत.

ग्रूमिंग एक्सपर्टसच्या मते प्रत्येक फॅशन आणि प्रत्येक स्टाईलच्या मागे एका अर्थाने मानसशास्त्र आहे असे म्हणावे लागेल. म्हणजेच आपण कोण आहोत, आपण कुठे राहतो, आपला व्यवसाय काय आहे, आपण कोणासोबत उठतो-बसतो, या सर्वच गोष्टींचा आपल्या पेहरावावर प्रभाव पडत असतो. त्याचमुळे कपड्यांची निवड करताना या सर्वच गोष्टींचा विचार केला जातो. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या पोशाखावरून त्याची विचारसरणी देखील जाहीर होत असते. एखाद्या व्यक्तीच्या पोशाखातून त्याचा आत्मविश्वास, विचारसरणी, आणि मनस्थिती समोर येत असते.

मग आपला पोशाख हवा तरी कसा? तर समोरच्या व्यक्तीवर छाप पाडण्यासाठी आपला पोशाख नीट नेटका असायला हवा. आजच्या फॅशनबरहुकूम पोशाख तुम्ही निवडलात, आणि तो परिधान केल्यानंतर तुमच्या हालचालींमध्ये सहजता नसली, तर तुमचा आत्मविश्वास खालावू शकतो. पोशाख आणि त्याबरोबरच्या अॅक्सेसरीज मुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला निराळे रूप प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे आपल्याला जिथे जायचे आहे, आणि ज्या कारणास्तव जायचे आहे, ते लक्षात घेऊन फॉर्मल किंवा कॅज्युअल पोशाख निवडावा.

Leave a Comment