या दिवसात आरोग्यासाठी उत्तम कलिंगड


निसर्गानेच उन्हाळ्याचा त्रास कमी करण्यासाठी काही फळे खास या काळासाठी दिली आहेत. त्यातीलच एक म्हणजे कलिंगड. उन्हाळ्यात जे सहज मिळते. खूप पाणी कलिंगडात असते आणि हे फळ आरोग्यासाठी उत्तम आहे.

हे फळ अल्कली गुणधर्माचे असल्यामुळे पित्ताच्या दोषांवर गुणकारी ठरते. शरीरातील खनिजे उन्हाळ्यात घामातून निघून जातात, पण कलिंगड खाल्ल्याने तहान भागते आणि शरीरातील खनिज द्रव्यांची हानी भरून निघते. सूर्यकिरणांच्या थेट माऱ्यामुळे होणारे रेडिएशनचे परिणाम कमी होतात.

कलिंगडात इतर फळांच्या तुलनेत पाणी आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने, उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या मूत्राशयाच्या विकारांवर कलिंगडाचे सेवन लाभदायक ठरते. जेवणानंतर कलिंगड खाणे हे जास्त उपयुक्त ठरते.

कलिंगड 78% भाग हा गराचा असल्याने ते खाद्य आणि पेय दोन्ही आहे. उन्हाळ्यात कलिंगडाएवढे उत्साहवर्धक पेय दुसरे नाही. कलिंगडातील पाण्याने पोट भरते. भूक लागत नाही. त्यामुळे तुमचे वजनही वाढत नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment