जे लोक ब्रेक घेऊन काम करतात, त्यांची क्रिएटिव्हिटी वाढते


ऑफिसमधील कामाचा हल्ली सगळ्यांनावरच दबाव असतो. त्यातच काहीजण तासोनतास एकाच जागेवर बसून काम करतात. पण एका संशोधना दरम्यान तासोनतास एकाच जागेवर काम करणारे कधीच यशस्वी होत नाही असे समोर आले आहे.

त्याचबरोबर या संशोधनात असे समोर आले आहे कि जे लोक ऑफिसमध्ये 52 मिनिटे काम करून 17 मिनिटांचा ब्रेक घेतात, ते चांगलं काम करतात आणि त्यामुळे त्यांची क्षमताही वाढते. जे लोक सतत काम करतात, त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो. शिवाय डोळ्यांचेही नुकसान होते. ब्रेक घेऊन जे लोक काम करतात, त्यांची क्रिएटिव्हिटी वाढते. कामावर त्याचा चांगला परिणाम होतो. संशोधनात असे देखील समोर आले आहे की, ब्रेक घेऊन काम केले तर कामाचा दर्जा सुधारतो. चांगले काम केल्याने प्रमोशन देखील होते.

Leave a Comment