चक्क ‘हॉर्स वूमन’ नावाने ओळखली जाते नार्वेमधील हि महिला


नार्वे(यूरोप) – घोड्याप्रमाणे एखादा मनुष्य धावू शकतो असे जर तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का? नाही ना… पण आम्ही तुम्हाला एका अशा महिलेबद्दल सांगणार आहोत, जी चक्क तिच्या घोड्याप्रमाणे चालण्यामुळे सध्या चर्चेत आहे. ही महिला नार्वेची रहिवासी असून तिचे नाव आयला कर्स्टन आहे. सध्या सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ वेगाने शेअर केले जात आहेत. फक्त वेगाने चालतच नाही, तर आयला घोड्याप्रमाणे एखाद्या अडचणीतून उडीसुद्धा मारू शकते.

तीन आठवड्यापुर्वीच इंस्टाग्रामवर कर्स्टन अकाउंट उघडले होते. पण तिची लोकप्रियता तिच्या या अनोख्या कौशल्यामुळे वेगाने वाढत आहे. तिची माहिती ट्विटरवरही लोक शेअर करत आहेत. तसेच, एका युझरने व्हिडिओ शेअर करून तिला ‘हॉर्स वूमन’ असे नावही दिले आहे. कर्स्टनने सांगितले की, चार वर्षांची असताना तिला कुत्र्याप्रमाणे चालणे आवडायचे.

याबाबतचा आपला अनुभवही कर्स्टनने शेअर केला आहे, ती म्हणाली की, असे चालताना मला कधीच दुखापत झाली नाही किंवा माझ्या मनगटाला त्रास झाला नाही. माझे हे वेगळे कौशल्य लोकांना चांगलेच आवडत आहे. यादरम्यान एका युझरने तिच्या कौशल्याला सलाम केला आहे.

काही व्हिडिओ कर्स्टनने शेअर केले आहेत, ती यामध्ये एका कुत्र्यासोबत पळत आहे, तर दुसऱ्यामध्ये घोड्यासारखे वेगाने पळत आहे. आयला ज्याप्रमाणे जमीनीवर हात-पाय ठेवून पळत आहेत, कोणालाही याचा अंदाज लावता येत नाही की, हा मनुष्यच आहे का प्राणी.

Leave a Comment