या मुळे टॉयलेट फ्लशमध्ये असतात दोन बटणे…


आता बहुतेक ठिकाणी वेस्टर्न टॉयलेटच बघायला मिळतात. भलेही इंडियन टॉयलेट ग्रामीण भागात असतील पण वेस्टर्न टॉयलेटच शहरात असतात. दोन प्रकारचे फ्लश बटन याप्रकारच्या टॉयलेटमध्ये असतात. ज्यातील एक बटण छोटे, तर दुसरे बटण मोठे असते. पण हे असे का असते याचा विचार तुम्ही कधी केला आहे का ? आज आम्ही तुम्हाला या बटणाबद्दलची माहिती देणार आहोत.

टॉयलेटमध्ये ड्यूअल फ्लश म्हणजेच दोन बटणे असलेले फ्लश देण्याची आयडिया अमेरिकेतील डिझायनर व्हिक्टर पापानेकने दिली होती. यावर सुरूवातीला छोट्या प्रमाणात टेस्ट केली गेली होती. ही टेस्ट यशस्वी झाल्यावर याचा वापर जगभरात होऊ लागला.

सध्या पाण्याची जगभरात समस्या भीषण झाली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पाणी वाचवण्यासाठी उपाय केले जात आहेत. वेस्टर्न टॉयलेटमध्ये ड्यूअल फ्लश म्हणजेच दोन बटन असणाऱ्या फ्लशचा वापर पाणी वाचवण्यासाठी केला जातो.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, सॉलिड वेस्ट रिमुव्हलसाठी वेस्टर्न टॉयलेटच्या फ्लशमध्ये मोठे बटन असते, जे दाबल्यावर ६ लिटर ते ९ लिटर पाणी वाहते. तर छोटं बटन दाबल्यावर वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण हे तीन ते चार लिटर असते.

Leave a Comment