या देशातून अश्या गोष्टींवरही आकारला जातो कर


जगातील बहुतेक सर्व देशात कोणत्या ना कोणत्या प्रकाराने नागरिकांना कर भरावे लागतात. सरकारचे ते प्रमुख उत्पन्न असते. बहुतेक सर्व देशात आयकर, मालमत्ता कर, संपत्ती कर आकारले जातात आणि त्यातही बहुतेक देशातील नागरिकांना आयकर आकारला जाऊ नये अशी इच्छा असते. ज्या देशात आयकर आकाराला जात नाही त्या देशांचे अनेकांना आकर्षण असते आणि असे देश पैसेवाल्यांना हेवन म्हणजे स्वर्ग वाटतात. आपल्याला कल्पना येणार नाही असेही काही कर विविध देशात आकारले जातात त्याची थोडीशी ओळख येथे करून देत आहोत.


काही देशात अगदी विचित्र गोष्टींसाठी कर आकारले जातात. अमेरिकेच्या अर्कान्स राज्यात शरीरावर टॅटू काढले किंवा शरीरावर गोंदवून घेतले तर ६ टक्के कर भरावा लागतो. अमेरिकेत २०१० पासून टॅनिंग कर ही आकाराला जात आहे. म्हणजे उन्हात बसून त्वचा काळवंडून घेणे. यावर कर लावण्यामागे तीव्र उन्हात बसल्याने त्वचेचा कर्करोग होण्याचे वाढलेले प्रमाण हे कारण सांगितले जाते.


अमेरिकेच्या अलाबामा मध्ये जो कर आकाराला जातो तसा जगात कुठेही आकाराला जात नाही. येथे खेळण्याच्या पत्त्यांवर कर आकाराला जातो. म्हणजे तुम्ही पत्ते कॅट खरेदी केला तर त्यावर कर भरावा लागतो. इटलीच्या वेनेरो शहरात म्हणजे रोमियो ज्युलीएटच्या गावात एका जागेचे नाव आहे कॉनेग्लीयानो. येथे हॉटेल, रेस्टॉरंट, दुकान यांचे बोर्ड अथवा त्यांच्या तंबूची सावली गल्लीतील रस्त्यांवर पडली तर १ वर्षाला १०० डॉलर्स असा कर भरावा लागतो.

स्पेन मधील वॅलरिक द्वीपसमूहावर २०१६ पासून उन्हावर कर आकाराला जात आहे. येथे दरवर्षी १ कोटीहून अधिक पर्यटक येतात आणि त्यामुळे सोयी सुविधांवर ताण येतो त्यामुळे कर आकारला जातो. हंगेरी मध्ये डबाबंद खाद्यपदार्थांवर कर आहे. कारण अश्या खाद्यपदार्थात साखर आणि मीठ यांचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे त्यावर पब्लिक हेल्थ प्रोडक्ट्स कर लावला जातो.


जपान मध्ये मेताबो कायदा लागू केला गेला आहे. त्यानुसार ४० ते ७५ वयोगटातील नागरिकांच्या कमरेचे माप दरवषी मोजले जाते. पुरुष कंबर ८५ सेंटीमिटर पेक्षा आणि महिलांची कंबर ९० सेंटीमीटर पेक्षा अधिक भरली तर कर द्यावा लागतो. आप्ल्स पर्वतरांगात स्कीईंग करणारे जखमी झाले तर त्यांच्यावर ऑस्ट्रियातील रुग्णालयात बहुतेक वेळा उपचार केले जातात आणि या मेडिकल सेवेवर खास कर आकाराला जातो त्याला प्लास्टर कर असे म्हटले जाते आणि हा कर स्कीईंग करणरे ज्या रिसोर्टमध्ये उतरले असतील त्या रिसोर्टकडून वसूल केला जातो.


चीनमध्ये डिस्पोजेबल लाकडी चॉपस्टिकवर २००६ पासून कर लावला गेला आहे. येथे दरवर्षी ४५ अब्ज चॉपस्टिक जोड डिस्पोजेबल प्रकारचे वापरले जातात. त्यासाठी दरवर्षी अडीच कोटी झाडे तोडली जातात. त्यामुळे हा कर आकाराला जात आहे.

Leave a Comment