पुण्यातील या डेअरीतून येते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अंबानींच्या घरी दुध


आपल्या अनेकांना देशातील सर्वात श्रीमंत व प्रसिद्ध व्यक्तींच्या वैयक्तित जीवनापासून, त्यांचे राहनीमानाबाबत, त्यांच्या खानपानाबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यातच रिलायन्स इंडस्ट्रिजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी तर नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. त्यांचे घर नेहमीच चर्चेत असते. पण आपल्यापैकी अनेकांना त्यांच्या घरातील बारीक सारिक गोष्टी अजूनही फार जास्त माहीत नाहीत. त्यापैकीच एक बाब म्हणजे मुकेश अंबानी यांच्या घरी दूध कोणत्या डेअरीतून येते आणि त्याची किंमत किती असते.

तर पुण्यातील देवेंद्र शहा यांच्या भाग्यलक्ष्मी डेअरीतून मुकेश अंबानी यांच्या घरी दूध येते. पुण्यातून ३ तासात दूध मुंबईत येते. हे दूध अनेकांच्या घरी सप्लाय केले जाते. रोज सकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत शहा यांच्या डेअरही व्हॅन लोकांच्या घरोघरी दूध सप्लाय करते. विशेष म्हणजे या डेअरीच्या ग्राहकांसाठी एक खास लॉगिन आयडी दिलेला असतो. ते त्याद्वारे ऑर्डर कॅन्सल करू शकतात, बदलू शकतात आणि वेगळ्या पत्त्यावरही मागवू शकतात.

देवेंद्र शहा यांच्या या डेअरीची खासियत म्हणजे येथे गायींची विशेष काळजी घेतली जाते स्वच्छतेवरही अधिक भर दिला जातो. गायींसाठी येथे रबर मॅट आहेत. जे दिवसातून तीन ते चार वेळा स्वच्छ केले जातात. त्याचबरोबर येथील गायींना पिण्यासाठी आरओचे पाणी मिळते. तसेच त्यांना चारा म्हणून सोयाबीन, अल्फा गवत हंगामी भाज्या आणि मक्याचा चारा दिला जातो. तसेच या डेअरीमध्ये २४ तास हळूवार आवाजात म्युझिक देखील सुरू असते.

या डेअरीच्या अनेक खास बाबी आहेत. त्यातील आणखी एक म्हणजे येथे २ हजार डच होल्स्टीन प्रजातीच्या गायी आहेत. २६ एकरात ही डेअरी बनली असून येथून रोज २५ हजार लीटर दुधाचे उप्तादन होते. येथे रोज सकाळी २ हजार गायींचे दूध काढले जाते. येथे जवळपास सगळी कामे म्हणजे गायीचे दूध काढण्यापासून ते दुधाचे पॅकिंगपर्यंत मशीन करतात.

मुंबई-पुणे शहरात या डेअरीचे केवळ १६ ते १८ हजार एवढे ग्राहक आहेत. ज्यात मुकेश अंबानी यांच्यासह अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांचाही समावेश आहे. हे दूध ते १५० रूपये लीटर या भावाने घेतात. भाग्यलक्ष्मी डेअरी प्रोजेक्टमध्ये शहा यांनी १५० कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती.