जाणून घ्या प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेबद्दल; असा होईल फायदा?


नवी दिल्ली – आपली सुरक्षा कोरोनासारख्या या महामारीच्या काळात सगळ्यात महत्त्वाची आहे. मोदी सरकारने यासाठी सुरू केलेली स्वस्त प्रीमियम योजना प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना तुमच्यासाठी उत्तम आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही एक मुदत विमा योजना आहे. जर यामध्ये गुंतवणुक केल्यानंतर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये मिळणार आहेत.

प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेला एक वर्षाचा जीवन विमा असून दरवर्षी या योजनेचे नूतनीकरण करता येते. कोणत्याही कारणामुळे विमाधारकाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीला 2 लाख रुपयांची रक्कम मिळते. या योजनेचा लाभ 18 ते 50 वर्षे वयोगटातील नागरिक घेऊ शकतात. या योजनेचा लाभ फक्त भारताचे नागरिक घेऊ शकतो. 55 व्या वर्षी योजना मॅच्युरिटी होते. या योजनेचे वार्षिक प्रिमीयम फक्त 330 रुपये आहे.

जीवन ज्योती वीमा योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. ओळखपत्र
  3. बँकेचे पासबुक
  4. मोबाईल नंबर
  5. पासपोर्ट साईज फोटो