तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता


पणजी – गोवा न्यायालयाने तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना दिलासा दिला आहे. एका महिलेने तरुण तेजपाल यांच्यावर लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. तरुण तेजपाल यांच्याविरोधात गेल्या 8 वर्षांपासून हा खटला सुरु होता. अखेर गोवा न्यायालयाने त्यांना दिलासा देत त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

दरम्यान, तरुण तेजपाल यांच्यावर एका महिलेने नोव्हेंबर 2013 मध्ये गोव्याच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलच्या लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर 30 नोव्हेंबर 2013 मध्ये याप्रकरणी तेजपाल यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर तरुण तेजपाल यांना जामिन मंजूर झाला होता. त्यानंतर याप्रकरणाची चौकशी करत असलेल्या गोवा पोलिसांनी 2014 मध्ये तरुण तेजपाल यांच्याविरोधात 2,846 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.