राज्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी उतरणीला; आज 44,493 रुग्णांना डिस्चार्ज


मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांची आकडेवारी उतरणीला लागली आहे. त्यातच दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत असल्यामुळे राज्याला थोडासा का होईना पण दिलासा मिळत आहे. राज्यात आज 44493 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत, तर 29644 नवीन कोरोनाबाधितांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 5070801 कोरोनाबाधित बरे झाले असल्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.74% एवढे झाले आहे.

त्याचबरोबर आज राज्यात 555 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.57% एवढा आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 32441776 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 5527092 (17.4 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2794457 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 20946 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण 367121 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.