जम्मू मध्ये १०० टक्के कोविड लसीकरण पूर्ण

करोना विरुध्द सुरु असलेल्या लढाईत जम्मू जिल्ह्यात ४५ वर्षांवरील व्यक्तींचे १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. १०० टक्के लसीकरण करणारा हा जम्मू काश्मीर राज्यातील पहिला जिल्हा बनला आहे. पूर्ण राज्यात ६२.६६ टक्के लसीकरण झाले असल्याचे सरकारी आकडेवारीत नमूद केले गेले आहे.

जम्मू जिल्हातील वीरवार येथे २१६७ जणांचे लसीकरण झाल्यावर १०० टक्के लसीकरण झाले असून येथे ५, ७२,९९४ नागरिकांना कोविड १९ लस दिली गेली आहे. जम्मू काश्मीरच्या उर्वरित जिल्यात सुद्धा लसीकरणाचा वेग चांगला आहे. राष्ट्रीय लसीकरण टक्केवारी ३२.१७ टक्के असताना जम्मू काश्मीर राज्यात ६२.६६ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणावर लक्ष केंद्रित करतानाच बेड वाढविणे आणि ऑक्सिजन बेड संख्या वाढविण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.

काश्मीर भागात शोपिया येथे सर्वाधिक लसीकरण झाले असून येथे ९७.७२ टक्के लसीकरण झाल्याचे समजते.