कोरोनामुळे बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंगच्या आईचे निधन झाल्याचे समोर आले आहे. अरिजित सिंग याची आई गेल्या काही दिवसांपासून कोलकात्यामधील रुग्णालयात उपचार घेत होती. कोरोनाबाधित असल्याचे आढळल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच काही दिवसांपासून त्या ECMOवर होत्या आणि त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. अरिजितच्या आईने आज सकाळी ११ वाजता अखेरच्या श्वास घेतला.
कोरोनामुळे सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंगच्या आईचे निधन
दरम्यान अभिनेता स्वास्तिकने अरिजित सिंगची आई रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला होता. त्याने सोशल मीडियावर एका पोस्ट केली होती. स्वास्तिकने लिहिले होते की, अरिजितच्या आईसाठी A रक्तगटाची आवश्यकता आहे. त्या Amri Dhakuria मध्ये भरती आहेत. त्याचबरोबर चित्रपट निर्मिता श्रीजित मुखर्जीने पण लोकांना विनंती केली होती. त्याने बंगालीमध्ये ट्वीटर करून अरिजित सिंगच्या आईसाठी मदत मागितली होती.