घरीच कोरोना चाचणी करणार असाल तर त्यापूर्वी ICMR ची नियमावली वाचा


घरच्या घरी स्वतःची लोकांना कोरोना चाचणी करता येईल अशा RAT टेस्टच्या किटला इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR) मंजुरी दिली आहे. या किटचे नाव COVISELF असे असून ही टेस्ट किट पुण्यातील माय लॅब डिस्कव्हरी सोल्युशन लिमिटेडने (My Lab Discovery solution Ltd.) तयार केले आहे.

मेडिकल शॉपवर हे टेस्ट किट फक्त 250 रुपयांत उपलब्ध होईल. आयसीएमआरने हे टेस्ट किट कसे वापरावे याबाबत काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. COVISELF टेस्ट कीट केमिस्ट शॉपमधूनच विकत घ्या, असा सल्ला आयसीएमआरने दिला आहे.

तसेच मोबाईलमध्ये COVISELF अॅप डाऊनलोड करा आणि त्यावर नोंदणी करा. टेस्ट कशी करायची याबाबतची संपूर्ण माहिती युझर मॅन्युअलमध्ये नीट वाचा. COVISELF किटमधील स्टिक वापरून नाकातील स्वॅब घ्यायचे आहेत. या किटमधील एका छोट्याशा बाटलीत ते ठेवायचे आहे. त्यानंतर प्रेग्नन्सी किटमधील स्ट्रिपप्रमाणे एक स्ट्रिप देण्यात आली आहे, त्यावर या स्वॅबचे नमुने टाकावेत.

हे अॅप ज्या मोबाइलवर डाऊनलोड करण्यात आले आहे, त्याच मोबाईलवर टेस्ट स्ट्रिपचा फोटा काढायचा. थेट आयसीएमआरच्या टेस्टिंग पोर्टल स्टोअरवर हा डेटा जाईल. यादरम्यान रुग्णाच्या गोपनीयता पूर्णपणे राखली जाईल. तुम्हाला मोबाईल अॅपमार्फत पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह याचा रिपोर्ट मिळेल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही