घरच्या घरी करोना टेस्ट करणाऱ्या किटला आयसीएमआर ची मंजुरी

पुण्यातील माय लॅब डिस्कव्हरी सोल्युशन लिमिटेड कंपनीला करोनाची चाचणी घरच्या घरी करता येणाऱ्या किटच्या निर्मितीचे अधिकार मिळाले असून या अँटीजेन चाचणी किट ला आयसीएमआर ने मंजुरी दिली आहे. ‘कोविसेल्फ’ नावाने हे किट उपलब्ध करून दिले गेले आहे.

हे किट कसे वापरायचे याच्या गाईडलाईन जारी केल्या गेल्या आहेत. या चाचणीसाठी घरच्या घरीच नाकातून सँपल घेता येणार आहे. हे किट ज्यांच्यात करोनाची लक्षणे दिसत आहेत त्यांच्यासाठी वापरता येणार आहे. तसेच प्रयोगशाळेत जे थेट कन्फर्म करोना केसच्या संपर्कात आले आहेत त्याच्यासाठी सुद्धा वापरता येणार आहे. त्यासाठी गुगल स्टोर व अॅपल स्टोरवरून एक मोबाईल अॅप डाऊनलोड करून घ्यायचे आहे. मोबाईलवरच चाचणीचा रिपोर्ट मिळणार आहे.

टेस्टिंग केल्यावर टेस्टिंग स्ट्रिप पिक्चर काढून ज्या मोबाईलवर अॅप डाऊनलोड केले आहे, त्याच मोबाईलवर हा डेटा द्यायचा असून तो थेट आयसीएमआर टेस्टिंग पोर्टलवर स्टोर होणार आहे. अर्थात यात रुग्णाची ओळख उघड होणार नाही. रिपोर्ट पोझिटिव्ह असेल तर संबंधिताला होम आयसोलेशनचे सर्व नियम पाळावे लागतील. करोना लक्षणे आहेत पण टेस्ट निगेटिव्ह आली तर आरटीपीसीआर करावी लागणार आहे असे समजते.