किती मिळतो राज्यांच्या मुख्यमंत्र्याना पगार, येथे वाचा

दक्षिणेकडील केरळ या छोट्या राज्यात दुसऱ्या वेळी सत्तेवर आलेले पी. विजयन आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असून नवीन चेहऱ्यांना त्यांनी मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार केरळ मुख्यमंत्र्यांना प्रतिमहिना १ लाख ८५ हजार पगार मिळतो. त्यात बेसिक पे, डियरनेस अलाउंस, घर भाडे आदि सामील आहे.

या निमित्ताने कोणत्या मुख्यमंत्र्यांना किती पगार मिळतो हे जाणून घेणे मनोरंजक ठरेल. भारतात प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मिळणारे पगार वेगवेगळे आहेत. विजयन याना मिळणारा पगार १८ राज्याच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा कमी आहे. देशात सर्वाधिक पगार घेणारे मुख्यमंत्री तेलंगानाचे आहेत. त्यांना दरमहा ४ लाख १० हजार पगार मिळतो. त्यापाठोपाठ दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचा नंबर असून त्यांना ४ लाख रुपये पगार मिळतो.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पगार दरमहा ३ लाख ६५ हजार आहे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दरमहा ३ लाख २१ हजार रुपये वेतन मिळते. मिझोरम, राजस्थान, उत्तराखंड, ओरिसा, बंगाल या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या पेक्षा कमी पगार मिळतो.

सर्वात कमी पगार नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना मिळतो. त्यांना दरमहा १ लाख १० हजार पगार आहे. पुडुचेरी १ लाख २० हजार, बंगाल १ लाख १७ हजार, कर्नाटक २ लाख, गोवा २ लाख २० हजार, गुजराथ ३ लाख २१ हजार, राजस्थान आणि उत्तराखंड १ लाख ७५ हजार, ओरिसा १ लाख ६५ हजार, मेघालय १ लाख ५० हजार, पंजाब २ लाख ९० हजार तर आंध्रप्रदेश मुख्यमंत्र्यांना ३ लाख ३५ हजार दरमहा पगार मिळतो.