परमबीर सिंह यांच्यावर केलेल्या बेहिशेबी मालमत्ता आरोपांसंदर्भात तक्रारदार पोलीस निरीक्षक भिमराव घाडगे यांचा नोंदवला जाणार जबाब


अकोला : राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून सध्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर केलेल्या बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांसंदर्भात चौकशी सुरु आहे. त्यासाठी मुंबईतील मुख्यालयात आज परमबीर सिंह यांच्याविरोधातील तक्रारदार पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. सध्या अकोल्यात घाडगे जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत. परमबीर सिंह यांच्यासह 33 वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात घाडगे यांच्या तक्रारीवरुन अकोल्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तक्रारदार पोलीस निरीक्षक भिमराव घाडगे यांचा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर केलेल्या बेहिशेबी मालमत्ता आरोपांसंदर्भात जबाब नोंदवला जाणार आहे. हा जबाब मुंबईतील कोकण भवन येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या मुख्यालयात नोंदवला जाणार आहे. भीमराव घाडगे त्यासाठी आज मुंबईत आले आहेत. घाडगे सध्या अकोल्यात जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत.

परमबीर सिंह यांच्यासह 33 वरिष्ठ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात घाडगे यांच्या तक्रारीवरूनच अकोल्यातील सीटी कोतवाली पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यांत अॅट्रॉसिटी अॅक्टच्या कलमांचाही समावेश करण्यात आला आहे. घाडगेंच्या आजच्या जबाबानंतर परमबीर सिंह यांच्याभोवतीचे फास आणखी आवळले जाण्याची शक्यता आहे. घाडगे आजच्या जबाबात परमबीर सिंह यांच्या बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात अतिशय महत्वाची माहिती आणि दस्तावेज राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला सोपवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.