सॅमसंगचा एम सिरीज एम ३२ लवकरच येणार

बजेट आणि मिडरेंज सेगमेंटमधील एकापेक्षा एक दर्जेदार स्मार्टफोन आणणाऱ्या सॅमसंगने त्यांचा नवा एम सिरीज एम ३२ स्मार्टफोन लवकरच बाजारात येत असल्याचे संकेत दिले आहेत. या फोनला नुकतेच ब्ल्यू टूथ एसआयजी सर्टीफिकेशन मिळाले असून त्यात फोनची फिचर्स समजली आहेत.

सॅमसंगचे एम सिरीज स्मार्टफोन ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत. नव्या एम ३२ स्मार्टफोनला ब्यु टूथ ५.० कनेक्शन मिळणार असून हा फोर जी फोन आहे. अँड्राईड ११ ओएस, ६ जीबी रॅम, ६४ आणि १२८ जीबी स्टोरेज पर्याय दिला गेला आहे. ६.४ इंची एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले, सेल्फी साठी यु आकाराचा नॉच, क्वाड रिअर कॅमेरा सेट अप आहे. प्रायमरी कॅमेरा ४८ एमपीचा तर ८ एमपीचे अल्ट्रावाईड आणि २ -२ एमपीचे डेप्थ आणि मॅक्रो सेन्सर असतील. सेल्फी साठी १३ एमपीचा कॅमेरा दिला गेला आहे.

या फोनला ६ हजार एमएएच बॅटरी दिली जात आहे. ती फास्ट चार्जिंग सपोर्ट करेल. हा फोन १० ते १५ हजाराच्या किमतीत उपलब्ध होईल असे सांगितले जात आहे.