उरी कमांड पोस्टवर लुटू शकता कॉफीपानाचा आनंद

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर सीमेवरील उरी येथील सैनिक तळावर केलेला भयानक हल्ला आणि त्याचा भारताने दिलेला जोरदार जबाब याची हकीकत उरी या चित्रपटामुळे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली आहे. आता याच एलओसी वरील शेवटच्या कमांड पोस्ट वर भारतीय सेनेने ६० फुट उंचीचा तिरंगा फडकावला आहे आणि येथील कॅफे फ्रीडम कॅफे टेरिया मध्ये बसून कॉफी पानाचा आनंद लुटण्याची सुविधा सर्व सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध केली आहे.

भारत पाकच्या या नियंत्रण रेषेवर फेब्रुवारी मध्ये युद्ध विरामाची घोषणा झाली आहे. मेजर विशाल देव सांगतात आम्ही येथील कॅफे टेरियाचा जीर्णोद्धार जम्मू काश्मीर मधील जनतेसाठी केला आहे. येथील ६० फुटी तिरंगा जोश आणि अभिमानाचा अनुभव देत आहे आणि जनता कमांड अमन सेतूला भेट देण्यासाठी उत्सुक आहे.

या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक येतात, सेल्फी घेतात त्याचबरोबर आता ते निवांत बसून खाण्यापिण्याचा आनंद घेऊ शकतात. फक्त येथेच मिळणारया काही गोष्टी आठवण म्हणून नेऊ शकतात. येथील ६० फुटी तिरंगा हे स्थिरतेचे प्रतिक आहे. येथे येणारे नागरिक सांगतात नियंत्रण रेषेवर सतत गोळीबार सुरु असायचा आणि त्यामुळे एकही रात्र शांत झोप मिळत नसे. युद्ध विराम झाल्यापासून येथे शांतता आहे आणि रात्री बेरात्री जीव वाचविण्यासाठी आता घर सोडून बाहेर पडावे लागत नाही. फाळणीच्या वेळी येथील काही भाग पाकिस्तानात गेला आहे. त्यामुळे नातेवाईकात दुरावा आला होता तो कॉफी हाउस मुळे कमी झाला आहे.

भारतीय सेनेला सुद्धा लोकांनी येथे यावे असे वाटते. त्यामुळे सेनेविषयीचे गैरसमज दूर होण्यास मदत मिळणार आहे.