आपल्या ग्रह्मालेतील युरेनस संबंधी अद्भूत माहिती

आपल्या सौरमालेत नऊ ग्रह आहेत. त्यातील प्रत्येकाचे काही वैशिष्ट आहे आणि त्यामुळे ते एकमेकांपासून वेगळे आहेत. आकाराने तीन नंबरचा  आणि द्रवामानात चार नम्बरचा मोठा असलेला ग्रह आहे युरेनस. याला अरुण ग्रह असेही नाव आहे.

या ग्रहावर माती पेक्षा वायूचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या ग्रहाला वायू दानव असेही म्हटले जाते. हा ग्रह त्याच्या अक्षावर ९८ टक्के झुकलेला आहे आणि त्यामुळे येथील वातावरण असामान्य आहे. येथे सतत वादळे होतात आणि ९०० किमी वेगाने वारे वाहतात.

या ग्रहावर रात्र आणि दिवस ४२ वर्षांचे असतात. या ग्रहाच्या दोन पोल पैकी एक सतत सूर्यासमोर तर दुसरा अंधारात असतो. सूर्यापासून या ग्रहाचे अंतर ३ अब्ज किलोमीटर आहे त्यामुळे हा सर्वात थंड ग्रह मानला जातो. येथे तापमान सरासरी उणे १९७ अंश असते. वैज्ञानिकांनी हे तापमान उणे २२४ पर्यंत गेल्याच्या नोंदी केल्या आहेत.

पृथ्वीवर सूर्यकिरणे पोहोचण्याचा वेळ ८ मिनिटे १७ सेकंद आहे. मात्र युरेनस वर हाच वेळ २ तास ४० मिनिटे इतका आहे. युरेनस स्वतः भोवतीची प्रदक्षिणा १७ तासात पूर्ण करतो मात्र येथील एक वर्ष पृथ्वीच्या ८४ वर्षे इतके आहे. या ग्रहावर ढगांच्या राशी आहेत. सर्वात वर मिथेन वायू आहे. येथे बर्फ आणि दगड सुद्धा आढळतात.