असे कराल आपल्या मुलांचे कोरोनापासून संरक्षण


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेज सोडून घरात बसावे लागत आहे. त्यातच आता त्यांच्यासाठी खेळायला जाणे, मित्र मैत्रिणींना भेटणेसुद्धा स्वप्नवत झाले आहे. सध्याच्या कोरोना लाटेत लहान मुलांचा कोरोनापासून बचाव करणे गरजेचे असून कारण हा कोरोना आधीपेक्षा जास्त धोकादायक असल्याचे दिसून येत आहे. लहान मुलांची योग्यवेळी काळजी घेतल्यास व्हायरसचा प्रसार होण्यापासून रोखता येऊ शकते, असे वसंत कुंजचे सिनियर कंसल्टंट पीडियाट्रिशियन डॉ. पवन कुमार यांनी सांगितले. नवभारत टाईम्सशी बोलताना यांनी लहान मुलांना सुरक्षित ठेवण्याचे उपाय डॉ. पवन कुमार सांगितले आहेत.

लहान मुलांवर कोरोनाची दुसरी लाट अधिक वाईट परिणाम करीत असून लहान मुले यावेळी सर्वाधिक असुरक्षित होत आहेत. मुलांमध्ये सुरूवातीला कोणतीही लक्षणे दिसत नसल्यामुळे त्यांचे विषाणू पसरविण्याचा धोका खूप जास्त जाणवेल. श्वासोच्छवासाच्या समस्येचे प्रमाण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जास्त आहे, म्हणून यावेळी मुलांना कोरोनापासून वाचवणे अधिक महत्वाचे आहे.

या काळात लहान मुलांना सोशल डिस्टेंसिंगचे महत्व पटवून देणे फार गरजेचे आहे. अनावश्यक इतर ठिकाणी लहान मुलांना जाऊ देऊ नका. सध्या सोसायटीतील इतर मुलांसह खेळायला पाठवू नका, शक्यतो घरच्याघरी खेळू द्या. मुलांना बाहेर न्यायचे असल्यास पालकांनी सोबत जावे. जर आपल्या मुलाने त्याच्या मित्रांना भेटायला जायचा विचार केला तर प्रेमाने समजावून सांगा. सोसायटीच्या मुलांबरोबर खेळण्याची परवानगी देऊ नका. मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते. म्हणूनच त्यांना घरी ठेवणे फार महत्वाचे आहे.

कोरोना टाळण्यासाठी केवळ मास्क वापरणे पुरेसे नाही तर वैयक्तिक स्वच्छतेशी संबंधित नियम मुलांना शिकवायला हवेत. डोळे, नाक आणि चेहरा या भागांना मुलांना वारंवार हात लावू देऊ नका. आपले हात धुण्यास आणि स्वच्छ करण्यास पुन्हा पुन्हा सांगा. खोकताना आणि शिंकताना चेहरा आणि तोंड झाकून ठेवायला सांगा आणि आजारी वाटत असल्यास मुलांना घरीच ठेवा.

आपले घर कोरोना प्रादुर्भावाच्या बचावासाठी नेहमीच स्वच्छ आणि साफ ठेवायला हवे. दरवाज्याचे हँण्डल, टॅबलेट, खुर्ची, बटणे साफ ठेवायला पाहिजेत. घराच्या बाहेरच बुट, चप्पल ठेवावेत, फळ, भाज्या घ्यायला जाताना हात स्वच्छ धुवा. बाहेरून आल्यानंतर कोणत्याही सामानाला लहान मुलांना हात लावू देऊ नका.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही